Chikhali : संतपीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 22 कोटींच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (Chikhali) चिखली येथे सुरू करण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे दुसऱ्या टप्प्याचे कामकाज करण्यात येणार आहे. त्यासाठी 21 कोटी 88 लाख 44 हजार 718 रुपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

संतपीठात शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत संतसाहित्य व वाड्‌मयाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, विविध वाद्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यासाठी निवास व्यवस्थाही करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संतपीठाचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. संतपीठाचे कामकाज नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या संचालक मंडळामार्फत केले जात आहे.

Chikhali : टाळगाव चिखली येथे मराठा आरक्षणासाठी भजन कीर्तनातून सरकारचा निषेध

येथील दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी स्थापत्य फ मुख्यालयाने 23 कोटी 54 लाख 1 हजार 274 रूपये खर्चाची निविदा काढली (Chikhali) होती. त्यासाठी बी. के. खोसे, एस. एस. साठे व अजवानी इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. अशा तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. खोसे यांची 7.09 टक्के कमी दराची 21 कोटी 88 लाख 44 हजार 718 रुपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. कामाचा कालावधी दीड वर्षे आहे. या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=DHpPTMZ1YcY

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.