Chikhali : टाळगाव चिखली येथे मराठा आरक्षणासाठी भजन कीर्तनातून सरकारचा निषेध

एमपीसी न्यूज – टाळगाव चिखली (Chikhali) येथे ह.भ.प. पठाडे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली चालु असलेले साखळी उपोषणात गुरुवारी (दि.2) सकल मराठा ग्रुप जाधववाडी तरुणांनी तसेच महिला यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा देत भजन व कीर्तनातून सरकारचा निषेध केला.

Mahad : महाड येथे कंपनीतील स्फोटात 11 जण बेपत्ता; चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश

यावेळी टाळगाव चिखली ग्रामस्थ हभप पठाडे महाराज, जितेन्द्र यादव, अमृतराव सोनवणे, गणपत आहेर, त्याचप्रमाणे सकल मराठा ग्रुप जाधववाडी संघटक अक्षय बगाटे, नवनाथ कदम , प्रदिप खट, राहुल गरड, शरद चोबे, तेजस मळेकर, सुरेश तळेकर, संपत घोगरे, सुनील थिगळे, स्वप्निल जरे, भरत कान्हुरकर, दत्तात्रय ढोबळे, सकल मराठा महिला ग्रुप जाधववाडी, संगिता लंके, नुतन वाळुंज, सविता कर्पे, विद्या खिल्लारी, राजश्री सातपुते, माधुरी घोगरे, ज्योती गारगोटे, सिंधु कदम, वर्षा खट, संगिता बगाटे, आकांक्षा मळेकर, उमाराणी चोबे, प्रीती गरड ,सानिका गावडे यांनी उपोषणात सहभाग घेतला.

ज्या भजनातून कीर्तनातून समाज घडला आज त्याच भजनातून कीर्तनातून मराठा समाजाला शांततेची ताकद मिळून एक दिवस (Chikhali) मराठ्यांना आरक्षण मिळेल हि ताकद आमच्या शांतप्रिय आध्यात्मात आहे. सरकारने वेळ काढूपणा न करत या प्रश्नावर तोडगा काढावा, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.