Mahad : महाड येथे कंपनीतील स्फोटात 11 जण बेपत्ता; चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश

एमपीसी न्यूज : रायगड जिल्ह्यातील (Mahad ) महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी (दि.2) सकाळी अकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात एकूण 11 जण बेपत्ता झाले असून आज (शनिवारी) सकाळपर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. शुक्रवारी रात्रभर शोधकार्य चालू होतं. उर्वरीत सात जणांचा शोध सुरु आहे.

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन देखील केलं. अपघाताच्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश आपण दिल्याचं यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. चौकशीनंतर अपघाता मागचं कारण स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले आहेत.

Ravet : एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या आर्या म्हस्केची अकलूजमध्ये कामगिरी; एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण झेप

गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या कंपनीत एकूण 57 कामगार काम करत होते. (Mahad ) त्यातील जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.