Chikhali : पवारवस्ती येथे मिक्सर कंटेनर उलटला 

The mixer container overturned at Pawarvasti :   या दुर्घटनेत चालक जखमी झाला आहे. 

एमपीसी न्यूज – चिखली येथील पवारवस्ती येथे सिमेंट घेऊन जाणारा मिक्सर कंटेनर उलटला.  या दुर्घटनेत चालक जखमी झाला आहे.  ही घटना आज (सोमवारी, दि. 27) दुपारी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, चिखलीमधील पवार वस्ती येथे स्पाईन रोडने सिमेंट कॉंक्रीटचे मिश्रण घेऊन जाणारा कंटेनर (एमएच 14 / एचयु 2239) रस्त्यावर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे.

मिक्सर कंटेनर भर रस्त्यावर उलटल्याने रस्त्यावरील दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

कंटेनर चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.