Chikhli : चिखलीत तीन वर्षाच्या मुलीवर शेजा-याकडून अत्याचार, आरोपी गजाआड


एमपीसी न्यूज – खेळायला म्हणून घेऊन गेलेल्या एका 18 वर्षाच्या तरुणाने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) उघडकीस आला. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शिवप्रसाद यादव (वय-18 रा. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या नारधमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी उत्तरप्रदेश मधील एका गावातील रहिवाशी आहेत. मुलीच्या वडिलांनीच आरोपीला पुण्यात कामासाठी आणले होते. आरोपी भंगार गोळा करायचे काम करत असून मुलीच्या घरा शेजारीच रहायला आहे. गुरुवारी सायंकाळी त्याने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

घरी आल्यावर आपल्यासोबत घडलेला प्रकार मुलीन आई वडिलांना सांगितला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
निगडी पोलीस तपस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.