Pimpri : पिंपरी-चिंचवड शहराने पांघरली दाट धुक्याची चादर (व्हिडीओ)


एमपीसी न्यूज – मागील दोन-तीन दिवस सलग पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाळा असल्याचा भास होत होता. यानंतर आज (शनिवारी) पहाटे पिंपरी चिंचवडसह शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला, त्यामुळे सर्वत्र दाट धुक्याची झालर पसरलेली दिसली. पिंपरी, चिंचवड, रावेत, आकुर्डी, देहूरोड, निगडी, तळेगाव, वडगाव यांसह मावळ भागात देखील दाट धुके होते. सकाळी सात वाजेपर्यंत धुक्याचा प्रभाव कायम होता.

वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शहर सर्वत्र थंडीत बुडाल्याचे दिसून आले. धुके दाट असल्याने दिवस उजाडला तरी देखील नागरिक वाहनांच्या लाईट सुरु ठेऊन आपली वाहने चालवीत होते. पाऊस कमी होऊन आज पहाटे अचानक थंडी वाढली. थंडीच्या कडाक्यानंतर फार उशिराने सूर्यदर्शन झाल्याने पुणेकरांनी या सूर्यदर्शनचा सुखद क्षण अनुभवला. अचानक पडलेल्या या धुक्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना सुखद अनुभव घेता आला.

दिवसा तापणारे ऊन आणि सूर्य माळवताच थंडी असे वातावरण शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी (दि. 8) शहराचे तापमान १८.२ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. थंडी सकाळी उशिरापर्यंत कायम असल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच कामोकामी बाहेर पडताना दिसत आहेत.

याच धुक्यांची छायाचित्र काढलेली आहेत एमपीसी न्यूजचे छायाचित्रकार सुहास रेळेकर यांनी…

"IMG

"IMG

"IMG

"IMG

"IMG

"IMG

एमपीसी न्यूजचे वाचक ऋषी रास्ते यांनी काढलेली काही छायाचित्र…

"rushi

"rushi

"rushi
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.