Chinchwad : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये चिमुकल्यांनी साजरा केला आदिवासी दिन

एमपीसी न्यूज – स्थानिक लोकांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर असलेल्या अनोख्या आव्हानांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ग्लोबल टॅलेंट (Chinchwad) इंटरनॅशनल स्कूलने आदिवासी दिन साजरा केला. यावेळी व्यवस्थापिका डॉ. स्वप्नाली धोका , प्राचार्या विद्युत सहारे आणि पीटीए सदस्यांचे स्वागत करून उत्सवाची सुरुवात झाली.

Chinchwad : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक-शिक्षक संघ निवड

इयता 9 वी मधील विद्यार्थ्यांनी सर्वाचा थोडक्यात परिचय करून दिला. इयता 6 वी आणि 7 वी मधील विद्यार्थ्यांनी आसाम राज्याच्या नृत्यप्रकाराचे वर्णन करणारे सुंदर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी लोक वापरत असलेली विविध प्रकारची भांडी आणि दागिने प्रदर्शित केले.

कला विभागाने सुंदर वारली चित्रे प्रदर्शित केली. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले, त्यांनी आदिवासी वेशभूषा करून पारंपरिक आदिवासी पोशाखांची माहिती घेतली.

या सत्रामुळे विद्यार्थ्यांना आदिवासी भागातील मुलांना भेडसावणाऱ्या अनोख्या आव्हाना बद्दल जाणून घेता आले. जीवनशैलीतील फरक पाहून ते थक्क झाले. डॉ. स्वप्नाली धोका आणि प्राचार्या विद्युत सहारे यांनी माहितीपूर्ण कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.