Chinchwad : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक-शिक्षक संघ निवड

एमपीसी न्यूज – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Chinchwad) पालक शिक्षण संघ निवडण्यात आला. यामध्ये प्रत्येक वर्गातील एक ते दोन पालकांनी सहभाग दर्शविला.

Akurdi : जावेद शेख यांचे समाजकार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी – गोविंद घोळवे

यासाठी शाळेच्या व्यवस्थापिका डॉ. स्वप्नाली धोका, प्रा. विदयुत सहारे तसेच मीनाक्षी कदम, स्वाती व्हीके, पार्वती रावत, गोपाली डे व लिन्सी बिनाभ्य शिक्षिका उपस्थित होत्या. सर्वात प्रथम विद्युत सहारे यांनी उपस्थित माता पालकांचे स्वागत केले.

पालक शिक्षक संघ निवड करण्यामागचा हेतू तसेच शाळेतील प्रत्येक उपक्रमांमध्ये पालकांचा तितकाच सहभाग आणि जबाबदारी महत्त्वाची आहे.  त्याबद्दल पालकांचे मिळणारे योगदान याविषयी संबोधित केले.

उपाध्यक्ष व सहसचिव यांची निवड उपस्थित पालकांकडून मतदान पद्धतीने करण्यात आली. यात उपाध्यक्ष पदासाठी सर्वात जास्त मते कविता पाटील यांना व सहसचिव या पदासाठी सर्वात जास्त मते अर्चना झाडे यांना मिळाली. डॉ. स्वप्नाली धोका यांनी निवडून आलेल्या माता पालकांचे रोपटे व भेटकार्ड देऊन अभिनंदन केले.

डॉक्टर स्वप्नांनी धोका यांनी पालकांना शाळेच्या विकासासाठी पालकांचा सहभाग किती  महत्त्वाचा आहे. याविषयी मार्गदर्शन केले. तसेच निवडून आलेल्या माता पालकांनी देखील आपली विचार पालकांसमोर मांडले. अशाप्रकारे पालक शिक्षक संघ निवड कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आदिवासी दिन साजरा करण्यासाठी पुढे  प्रस्थान करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.