Akurdi : जावेद शेख यांचे समाजकार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी – गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज – दिवंगत नगरसेवक जावेद शेख हे अहोरात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी ( Akurdi ) झटणारे कार्यकर्ते होते. नागरिकांसाठी त्यांनी राबविलेले विविध उपक्रम अविस्मरणीय आहेत. त्यामुळे जावेद शेख यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे असे महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष, भगवानगडाचे सचिव गोविंद घोळवे म्हणाले.

दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या तृतीय पुण्यस्मृती दिनानिमित्त झाकीर रमजान शेख यांच्यातर्फे आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिरा प्रसंगी ते बोलत होते. कोरोना काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रभागात जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली.  म्हणूच जावेद शेख यांनी समाज कार्याचा आदर्श घालून दिला असे म्हणता येईल. त्यामुळेच जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करणे ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल. त्यासाठीच रक्तदानासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी पुढे आले पाहिजे. तर, रक्तपेढी संचालकानी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरासाठी प्रयत्न करावा, असेही घोळवे म्हणाले.

ससून रुग्णालयाचे डॉ. बाळासाहेब राठोड यांनी रक्तदान व त्यांचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. तर महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयाच्या वतीने अ‍ॅनीमिया मुक्त भारत व क्षय रोग जनजागृती अभियाना संदर्भात माहिती पत्रकाचे वाटप केले. संजीवनी ब्लड बॅंकेच्या विशेष सहकार्याने आयोजित शिबिरात 162 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Moshi : मोशी येथे होर्डिंग दिसत नसल्याने तोडली पाच झाडे

त्यावेळी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेटचे वाटप केले. याच शिबिरात शहरातील डोळ्याची लागण पाहता डॉ . चाकणे हॉस्पिटलच्या वतीने 114 नागरिकांची मोफत  नेत्र तपासणी करण्यात आली. तर वेलनेस सेंटर आंबेगाव यांच्या वतीने 143 नागरिकांचे फ्री बॉडी चेकअप करण्यात आले.  आकुर्डी रुग्णालयाच्या वतीने 96 नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी  नगरसेविका वैशाली काळभोर, सीमा साळवे, आशा शेंडगे, उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी , विशाल  काळभोर, विनोद आडसकर, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, आझम खान,  आशा शिंदे , मनीषा गटकळ , कविता खराडे ,  पुष्पा शेळके , मीरा कदम , अरुणा सिलम, मनीषा उत्तेकर , नंदा गायकवाड़ , लता चव्हाण  , वैशाली गायकवाड ,गीता सुतार , मुमताज इनामदार, अलका कांबळे ,

मोहिनी आणेकर, सुवर्णा साळवे, उद्द्योजक किशोर गाथाडे , नानासाहेब पिसाळ , प्रवीण पवार ,केदार वायाळ  तसेच टाटा मोटर्स कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक माने , रमेश भोरकर , शेखर  जाधव,सुभाष चौधरी ,  ज्येष्ठ नागरिक अण्णा कुऱ्हाडे , ज्ञानेश्वर ननावरे , वसंत सोनार , गोविंद राजेशिर्के , यशवंत भालेराव , रमेश बनसोड , गौतम बेंद्रे , अण्णा भोसले , गंगाधर चौधरी , सुभाष चौधरी अरुण रडे , अनिल पाटील , कांतिलाल गड़गुले, पांडुरंग शिरोडकर , संपत शिंदे , गिरीश जोशी  सतीश सिलम  , दत्ता बो-हाडे, अनंता इंगळे, श्रीकांत वांद्रे, महेश काटे उपस्थित होते.

शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद व सामाजिक कार्यकर्ते झाकिर शेख यांनी केले.  तर संयोजनात  मिनाज शेख , फैज शेख , शाहरुख शेख यांनी पुढाकार घेतला.तर सुनील मोरे , सूरज मोरे , जावेद पठाण , सनी गोडसे , जिब्राईल शेख , सुयोग काळभोर, नीलेश कदम , सिद्धार्थ पानसरे ,दीपक सावंत यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम ( Akurdi ) घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.