Chinchwad : टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – हॉटेलला रेटिंग देण्याचा टास्क पूर्ण (Chinchwad ) करण्याच्या बहाण्याने महिलेची 19 लाख 32 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 1 जून ते 9 जून या कालावधीत पूर्णानगर, चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी महिलेने मंगळवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बँक खाते धारक, टेलिग्राम आयडी धारक आणि एका लिंक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाची दुचाकी नेली चोरून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क करून (Chinchwad ) त्यांना हॉटेलला रेटिंग देण्याचा टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादीची 19 लाख 32 हजार 861 रुपयांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.