Hinjwadi : कंपनीतील हेल्पर महिलेवर सुपरवायझरकडून बलात्कार, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी (Hinjwadi) येथे एका कंपनीत काम करणाऱ्या सुपरवायझरने त्याच कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार 26 मे रोजी हिंजवडी फेज 2 येथील एका कंपनीत झाला आहे.

Bhosari : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाची दुचाकी नेली चोरून

याप्रकऱणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सुर्यकांत गणपती रामनल्ली (वय 34 रा. हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व आरोपी हे एकाच कंपनीत काम करतात. आरोपी हा सुपरवायझर असून त्याने 26 मे रोजी पीडितेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. तसेच तू माझे काहीही वाकडे करू शकत नाही असे म्हणून धमकी दिली. यावरून हिंजवडी (Hinjwadi)पोलिसांनी  आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.