Khed : शेतकरी, व्यापाऱ्यांना अधिक सुविधा देऊ – दिलीप मोहिते

एमपीसी न्यूज : खेड बाजार समितीच्या आवारातील (Khed) प्रलंबित प्रश्न व असुविधांच्या बाबत शेतकरी, व्यापारी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 13) बाजार समितीच्या नूतन कार्यकारी मंडळाने चाकण मध्ये पाहणी केली. यावेळी बाजार समितीचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह सभापती, उपसभापती व संचालक उपस्थित होते.

आ. दिलीप मोहिते यांनी यावेळी सांगितले कि, मागील अनेक दिवस बाजार समितीवर प्रशासक होते. आता नूतन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. शेतकरी, अडते , व्यापारी यांना येथे अधिकाधिक सोई सुविधा मिळाव्यात यासाठी काय- काय करता येईल याची पाहणी करण्यात आली आहे. पुढील कालखंडात (Khed) सर्वांशी चर्चा करून महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

Chinchwad : टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

शेतकऱ्यांचा माल मार्केट मध्ये आल्यानंतर अनेकदा पावसात भिजून होणारे नुकसान टाळण्यासाठी ऑक्शन हॉल उभारण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील आ. मोहिते यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे , सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्यासह संचालक, व्यापारी, अडते, शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.