Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 234 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 234 जणांवर बुधवारी (दि. 15) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक सुधारण्याचे नाव घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना विषाणूची बाधा झालेले 34 सक्रिय रुग्ण आहेत. मागील काही दिवसांपासून सलग ही संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा यावर उपाययोजना करीत आहेत.

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात घराबाहेर येण्याने याची भीती जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहून हा संसर्ग रोखण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र नागरिक घरात बसण्याच्या मनस्थितीत नाहीत.

शासकीय आदेशाचे उल्लंघन करून घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीतच आहेत. बुधवारी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 234 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

  • बुधवारी करण्यात आलेली कारवाई –
    पिंपरी – 01
    चिंचवड – 16
    भोसरी – 14
    एमआयडीसी भोसरी – 05
    निगडी – 22
    दिघी – 28
    आळंदी – 07
    चाकण – 02
    वाकड – 09
    हिंजवडी – 48
    सांगवी – 37
    चिखली – 28
    देहूरोड – 02
    तळेगाव दाभाडे – 06
    तळेगाव एमआयडीसी – 03
    रावेत चौकी – 03
    म्हाळुंगे चौकी – 02
    शिरगाव चौकी – 01
    एकूण – 234

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.