Akurdi : कोरोना काळात पवार कुटुंबियांकडून 435 काेटी रूपयांची कमाई – किरीट सोमय्या

एमपीसी न्यूज – कोरोना काळात पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने (Akurdi)पवार कुटुंबियांशी संबंधित असलेल्या निओ स्टार इन्फ्रा प्राेजेक्ट लि. कंपनीच्या खात्यावर 435 काेटी रूपये टाकले आहेत.

 

कंपनीची एक लाखाची गुंतवणूक असताना 435 कोटी कशाचे टाकले, हे कमिशन आहे का, कोरोना काळात पवार कुटुंबियांनी 435 काेटी रूपयांची कमाई केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

सोमय्या यांनी आकुर्डीतील कंपनी नोंदणी कार्यलयाला आज सोमवारी भेट दिली. यावेळी आमदार अश्विनी जगताप, सदाशिव खाडे, अमित गोरखे, नामदेव ढाके, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले की, शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार (Akurdi)यांनी एक कंपनी उभारली. त्यातून एक पैशांची उलाढाल न करता 435 काेटी रूपयांची कमाई केली. प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्राेजेक्ट लि. कंपनीला हे पैसे मिळाले आहेत. याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या दिल्लीत उच्च अधिका-यांची भेट घेणार आहे. 2022 पर्यंत बॅलन्सशीट पाहिले आहेत. तोपर्यंत कोणतेही व्यवहार झाले नव्हते.

Pimpri : मराठा आरक्षणासाठी ‘घर टू घर’ माहितीचे हाेणार संकलन

मार्च 2021 मध्ये 435 काेटी सिरम इन्स्ट्यूटने प्रताप पवार यांच्या कंपनीला 6 टक्के रेडिमेबल पेप्रर्सं शीट म्हणजे कंपनीला द्यायची इच्छा झाली तर व्याज द्यायचा या प्रमाणे दिले आहेत. 2021 आणि 2022 मध्ये एक दमडीचेही व्याज देण्यात आले नाही. 435 काेटीपैकी 300 काेटी प्रताप पवार यांनी दुस-या कंपनीत वळविले आहेत. याची पूर्ण चाैकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारत सरकारचे कंपनी मंत्रालय, अंमलबजावणी संचनालय, आयकर विभागाने करावी, ही पवार परिवाराने वसुली केली आहे.

हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर पवार परिवाराने 100 काेटींचा दावा ठाेकण्याची मला धमकी दिली. 435 काेटींचा हिशाेब द्या. या वसुलीचा जाब पवार परिवाराला द्यावा लागणार, असेही ते म्हणाले.

ज्या-ज्या माझ्या तक्रारी झाल्या. त्यामध्ये 100 टक्के तथ्य आढळले. मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रकरण न्यायालयात चालू आहे. पुढच्या निर्णय न्यायालयाने घेणे अपेक्षित आहे. न्यायालयापर्यंत पाेहचविण्याचे माझे काम आहे. खासदार भावना गवळी यांच्या सव्वा आठ काेटींची आयकर विभागाने मालमत्ता अँटँच केली, असेही ते म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.