Pimpri : मराठा आरक्षणासाठी ‘घर टू घर’ माहितीचे हाेणार संकलन

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या (Pimpri) वतीने राज्य सरकारला 20 जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे. यामुळे मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मराठा समाजाच्या ‘होम टू होम’ जाऊन माहिती संकलित करण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेकडून आठ प्रभागांसाठी सुमारे 2200 कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील राज्य सरकारची धावपळ सुरू आहे. मराठा समाजाचे आरक्षण न दिल्यास लाखो मराठे हे मुंबईत धृडक देणार असल्याचा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे-पाटील यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी तातडीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मराठा समाजाचे प्रश्न, त्यांना देणाऱ्या सोयीसुविधा, सामाजिक व शैक्षणिक प्रश्न आदी माहिती संकलित करण्यात येणार आहे.

Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील मॉल प्रशासन मराठी भाषेबाबत उदासीन

राज्य सरकारने सर्व विभागीय आयुक्त, नोडल अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी जीआर काढत सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा समाजाची माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे नोडल (Pimpri) अधिकारी म्हणून तर उपायुक्त अविनाश शिंदे यांची सहायक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता महापालिकेकडून आठ प्रभागांसाठी सुमारे दोन हजार 200 कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार आहेत. ते कर्मचारी घरी जाऊन माहिती घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.