Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील मॉल प्रशासन मराठी भाषेबाबत उदासीन

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक (Pune) मॉलमध्ये अजूनही इंग्रजी पाट्या दिसत आहेत. मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले असताना मॉल प्रशासनाकडून याबाबत उदासीनता दाखवली जात आहे. त्यामुळे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार महासंघाचे सचिव प्रदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते अतुल गायकवाड, वृषाली धोत्रे आदी उपस्थित होते.

नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांमध्ये मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत आदेश दिले आहेत. असे असतानाही पुणे जिल्ह्यातील अनेक मॉलमध्ये अजूनही इंग्रजी भाषेत पाट्या लावलेल्या आहेत. हे मॉल प्रशासन न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील एल्प्रो सिटी मॉल तसेच डेक्कन मॉल, फिनिक्स मॉल, लाईफस्टाईल मॉल अशा अनेक मॉल प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आहे.

Pune : बहारदार बासरी वादनाने रंगला मिस्टिक बांबू महोत्सव

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित मॉल प्रशासनाला (Pune) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत सांगण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे मराठी भाषेचा आदर आणि मराठी संस्कृतीचा सन्मान वाढेल अशी आशा नाईक यांनी व्यक्त केली आहे. मराठी भाषेमध्ये पाट्या लावण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच मॉलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देखील नाईक यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.