Pune Cricket Stedium : रणजी सामन्या दरम्यान पुणे स्टेडियमवर साईटस्क्रीन कोसळली

एमपीसी न्यूज – रणजी ट्रॉफीचे सामने सध्या सुरू(Pune Cricket Stedium) आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड या संघांमध्ये 12 जानेवारीपासून सामना खेळला जात आहे.

हे सामने पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळले जात आहेत. या सामन्या दरम्यान स्टेडियमवर साईटस्क्रीन कोसळल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही खेळाडूला इजा झालेली नाही.

महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यातील सामन्यांना 12 जानेवारी (Pune Cricket Stedium)रोजी सुरुवात झाली. 13 जानेवारी रोजी झारखंड टीमची फलंदाजी झाल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले.

Pimpri : मराठा आरक्षणासाठी ‘घर टू घर’ माहितीचे हाेणार संकलन

दरम्यान वादळी वाऱ्यामुळे मैदानाच्या बाजूला लावलेली साईटस्क्रीन पडली. मैदानातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही स्क्रीन बाजूला करत दुरुस्तीची कामे केली. त्यानंतर अर्धा तास विलंबाने उर्वरित सामना सुरू झाला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पुणे (गहुंजे) येथे सन 2012 मध्ये क्रिकेट उभारले आहे. या स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपचे पाच सामने झाले होते. या मैदानावर आतापर्यंत 51 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. तसेच आजवर दोन कसोटी, चार टी 20 आणि 12 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. यामध्ये क्रिकेट स्टेडियम वरील साईट स्क्रीन खराब झाली होती. पावसामुळे संघांना सराव देखील करता आला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.