Chinchwad : अपघात अन् वाहतूक कोंडीसाठी शहरातील 28 रस्ते ठरत आहेत कारणीभूत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Chinchwad) हद्दीतील 28 रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याशिवाय पुणे महापालिकेच्या हद्दीतील पाच, राष्ट्रीय महामार्गावरील 12 रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. खड्डे, पाणी साचणे व अरुंद रस्त्यांमुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. या समस्यांना आळा घालण्यासाठी रस्त्यांवर उपाययोजना कराव्यात असे पत्र पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेला पाठविले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात 29 जून रोजी पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात झाल्यावर कोणत्या परिसरात काय समस्या निर्माण होईल, याचा आढावा पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे यांनी घेतला.

यामध्ये शहरातील 28 रस्त्यांवर पडलेले खड्डे, सखोल भागात साचणारे पाणी व अरूंद रस्त्यांमुळे वाहतूकीस होणारा अडथळा याबाबत महापालिकेला पत्र पाठविले आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या समस्यांवर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पोलीस आयुक्‍तालयातील मात्र पुणे महापालिकेच्या (Chinchwad) हद्दीत येणाऱ्या बावधन व हिंजवडी वाहतूक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याची यादी पुणे महापालिकेला पाठविण्यात आली आहे. याशिवाय पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग जातात. येथील 12 ठिकाणी रस्ते खराब असून त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

Chinchwad : नैतिकतेने काम केले तर समाजमन विचलीत होणार नाही – भाऊसाहेब भोईर

यामध्ये चाकण (1), देहूरोड (2), हिंजवडी (3), तळेगाव (1), बावधन (3), वाकड (2) या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच हिंजवडीमधील खराब रस्त्यांबाबत हिंजवडी एमआयडीसीलाही पोलीस आयुक्‍तांनी पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

वाहतूक पोलीस विभागनिहाय समस्याग्रस्त रस्त्यांची संख्या –

निगडी – 3
भोसरी – 2
पिंपरी – 6
दिघी आळंदी – 2
तळवडे – 10
देहूरोड – 2
सांगवी – 1
वाकड – 2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.