Chinchwad : वाहतूक विभागाकडून कारवाईचा दणका; एका महिन्यात पावणेतीन कोटींचा दंड

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Chinchwad) करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने उगारला आहे. 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी 32 हजार 775 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्यावर दोन कोटी 72 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीशी निगडीत होणाऱ्या अपराधांची संख्या देखील वाढू लागली आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Dighi : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

नोव्हेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत दोन कोटी 72 लाख 91 हजार 700 रुपयांचा दंड (Chinchwad) आकारला आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 607 वाहन चालकांवर थेट खटले दाखल केले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी केलेल्या मार्गावर प्रवेश करणाऱ्या 6372 जड अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. महिन्याभरात एकूण 32 हजार 775 वाहन चालकांवर ही कारवाई केली आहे.

वाहतूक शाखेने केलेल्या कारवाया –

मोबाईल फोनवर बोलणे – 939
सिग्नल जम्प करणे – 1728
ट्रिपल सीट – 3559
विना हेल्मेट – 2880
विदाऊट सीटबेल्ट – 2220
काळी काच – 1390
सायलेन्सर – 884
वाहतुकीस अडथळा – 8967
बीआरटी मधून वाहन चालवणे – 3229

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.