Chinchwad : एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या समान – नितीन हिरवे

एमपीसी न्यूज – एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या समान असते, असे मत ज्येष्ठ प्रकाशक नितीन ( Chinchwad)  हिरवे यांनी व्यक्त केले.चिंचवड येथे रविवारी ‘कथा पुस्तक जन्माची’ या विषयावरील व्याख्यानातून केले.

भारतीय स्त्री शक्ती जागरण, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित वाचकमंच मेळाव्यात प्रकाशन क्षेत्रातील आपले रंजक अनुभव कथन करताना ते बोलत होते. साहित्यिक अनिल आठलेकर, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, राधाबाई वाघमारे, कैलास भैरट, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे, गणेश आढाव आणि वाचकमंच प्रमुख वासंती कुलकर्णी यांच्यासह वाचकमंच महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Vadgaon Maval : तालुका खरेदी विक्री संघात महायुतीला 16 जागा

हिरवे पुढे म्हणाले की, “नवोदित लेखक, कवींनी आपल्या लेखनाकडे तटस्थपणे पाहावे. टीकाटिप्पणीचे स्वागत करावे. विविध नियतकालिकांमधून आपल्या लेखनाला रसिकांना दाद दिल्यानंतरच पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घ्यावा; तसेच प्रकाशकांनी साहित्य निवड करताना चोखंदळपणा दाखवून मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत पुस्तक सर्वांगसुंदर कसे होईल, याची दक्षता घ्यावी.

आय एस बी एन क्रमांक, कॉपी राईट्स याविषयी लेखकाने जागृत राहावे. प्रकाशन सोहळा, ऑनलाईन माध्यमांचा वापर, नियतकालिकांमधून पुस्तक परीक्षण या गोष्टींमुळे पुस्तक जागतिक पातळीवरील वाचकांपर्यंत पोहचते. आपल्या घरात पुस्तकांचे कपाट असावे, नियतकालिकांचे नियमित वाचन करावे, व्यस्त दिनक्रम असला तरी निदान रेडिओच्या माध्यमातून जगाशी स्वतःला जोडून घ्यावे; कारण या गोष्टींमुळे जीवन सुसंस्कृत होते. घरातील मुलांना आपण जसा जीव लावतो; तसे प्रेम पुस्तकांवर केले तर जगणे सुखाचे ( Chinchwad) होईल!”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.