Mahalunge : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणाचा ( Mahalunge) मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.25) सकाळी साडेसातच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ चौकात घडला.

याप्रकरणी सुनिलकुमार राजाराम अय्यर (वय 21 रा. महाळुंगे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तिरथ अय्यर (वय 20 रा.महाळुंगे )  या तरुणाचा ( Mahalunge) मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मेहुण्याचा भाऊ तिरथ हा चौकातून फिर्यादीसह अल्ट्राटेक कंपनी येथे जात होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.यात तिरथ अय्यर हा गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Mahalunge) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.