Vadgaon Maval : तालुका खरेदी विक्री संघात महायुतीला 16 जागा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (Vadgaon Maval) महायुतीने 16 जागा जिंकल्या.संघावर एकहाती वर्चस्व मिळवले असेल तरी मातब्बर नेते एकत्र असताना देखील महत्वाच्या असलेल्या अ गटातील तीन उमेदवारांचा पराभव झाला.तर एक जागा अवघ्या काही मतांनी विजयी झाली. ही महायुतीसाठी विचार करायला लावणारी बाब आहे.
मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महायुतीने 19 जागांपैकी 16 जागा जिंकल्या असल्यातरी मातब्बर नेते एकत्र असताना देखील महत्वाच्या असलेल्या अ गटातील तीन उमेदवारांचा पराभव झाला तर चौथी जागा ईश्वर चिठ्ठीने मिळाली.तर एक जागा अवघ्या मतांनी विजयी झाली. ही निवडणूक राष्ट्रवादी,भाजप व शिवसेना अशी महायुतीने लढवली होती.
निवडणुकी आधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध झाल्या होत्या.उर्वरित नऊ जांगाही बिनविरोध होणे संस्थेच्या हिताचे होते; मात्र हे संस्थेचे हीत न पाहता काहींनी राजकीय पदाच्या लालसेपोटी उमेदवारी ठेवण्याचा हट्ट धरला. त्यामुळेच संस्थेवर निवडणूक लादली गेली, अशी नागरीकांमध्ये चर्चा  आहे.
शिल्लक नऊ जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात होते.राज्यात महायुती झाल्यानंतर मावळातील पहिलीच निवडणुक महायुतीच्या माध्यमातून लढवली. ही निवडणूक लागल्यामुळे काही उमेदवारांना कारण नसतानाही पैशांचा मोठाच भुर्दंड पडला.
मावळ खरेदी विक्री संघाच्या 19 जागांपैकी 10 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित अ वर्गातील चार, क वर्गातील तीन, इतर मागास वर्ग एक व अनुसूचित जाती – जमाती प्र वर्गातील एक अशा नऊ जागांसाठी रविवारी उत्साहात मतदान झाले.

नऊ जागांसाठी 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत अ वर्ग मतदार संघात 100 टक्के मतदान झाले. त्यात टाकवे गटात सहा पैकी सहा,शिवणे गटात सात पैकी सात, खडकाळे गटात सहा पैकी सहा व वडगाव गटात सहा पैकी सहा, क वर्ग मतदार संघात दोन हजार 32 पैकी एक हजार 102 ( 54.23 टक्के )तर इतर मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती जमाती मतदार संघात दोन हजार 133 मतदारांपैकी एक हजार 181( 55.36 टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची वेळ संपल्यानंतर अर्ध्या तासात निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली.
सुरुवातीला क वर्ग मतदार संघाची मतमोजणी करण्यात आली. क वर्ग व अनुसूचित जाती जमाती मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. मात्र इतर मागास वर्ग मतदार संघात मोठी चुरस दिसून आली.
अ वर्गातील टाकवे गटात शिवाजी असवले व शांताराम लष्करी यांना प्रत्येकी तीन मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली. तिचा कौल असवले यांच्या बाजूने लागला. तर इतर मागास प्रवर्गातील पराभूत उमेदवार काळूराम थोरवे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. ती मान्य करण्यात आली मात्र निकालावर परिणाम झाला नाही.
मतदार संघ व उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे –
सर्वसाधारण अ वर्ग प्रतिनिधी- टाकवे बुद्रूक गट- शिवाजी चिंधू असवले ( 3 विजयी, महायुती ) प्रकाश रामचंद्र देशमुख (0), शांताराम सुदाम लष्करी (3),शिवणे गट- विष्णू गोपाळ घरदाळे ( 4 विजयी),धनंजय एकनाथ टिळे ( 3 महायुती),खडकाळे गट- रमेश रघुनाथ भुरुक ( 4 विजयी),संतोष श्रीपती कोंढरे (2 महायुती),वडगाव गट – निलेश दशरथ म्हाळसकर (2 महायुती),एकनाथ महादू येवले ( 4 विजयी),क वर्ग मतदार संघ (3 जागा ) – माणिक मारुतराव गाडे (805 विजयी),किरण दौलत हुलावळे (818 विजयी),गणेश मारुती विनोदे ( 745 विजयी,सर्व महायुती ),सदाशिव आनंदराव सातकर (317), बबन महादू आरडे(122), मारुती तुकाराम असवले(58),अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती मतदार संघ ( 1 जागा )- नारायण विष्णू चिमटे(192), मधुकर रतिकांत जगताप(894 विजयी, महायुती), इतर मागास प्रवर्ग मतदार संघ (1 जागा)- अमोल तुकाराम भोईरकर (508 विजयी, महायुती),काळूराम गबाजी थोरवे (497),खंडू बाळाजी तिकोने(91).मतदान व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार (Vadgaon Maval)  पडली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.