Pune : पत्नीचा डोक्यात दगड घालून खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून  खून  करत  झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात ही  घटना घडली . या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृतांची नावे आहेत.

Maharashtra : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट व एसटी सेवा बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. ते दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. त्या ठिकाणी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. दरम्यान, सकाळी 11 वाजून गेले तरी ते घरी परत आले नाहीत.

त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध घेतला. सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात दिसली. त्या परिसरात शोध घेतला असता आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून ( Pune) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.