Chinchwad : तीन वर्षांपासून गुंगारा देणारा ठग अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसायिकांकडे सेल्समन ( Chinchwad) म्हणून काम करत ग्राहकांकडून आलेली रोख रक्कम घेऊन प्रसार होणारा ठग तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने त्याला पुणे परिसरातून अटक केली आहे.

साइमन रॉनी पीटर (वय 40, रा. उंड्री पिसोळी, कात्रज बायपास, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट एक कडून समांतर तपास केला जात होता. त्यातील आरोपी साइमन पीटर हा बांधकाम व्यवसायिकाकडे सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करायचा व ग्राहकांकडून रोख स्वरूपात आलेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन प्रसार होत असे.

Pune : ‘चिरीमिरी’ घेतल्या प्रकरणी वाहतूक पोलीस निलंबित

आरोपी साइमन पीटर हा मागील तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर पोलिसांना गुंगारा देत होता. तो सतत आपली राहण्याची ठिकाणे बदलत होता. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे आणि अजित रुपनवर यांनी साइमन पीटर याचा माग काढून त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी कात्रज बायपास येथून त्याला ताब्यात घेतले. आरोपी साइमन याच्यावर सन 2022 मध्ये तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात देखील अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्याने हिंजवडी, हडपसर, पिरंगुट या परिसरात अशा प्रकारचे गुन्हे झाले केल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे, तांत्रिक विश्लेषक पोलीस अमंलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी ( Chinchwad) केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.