Chinchwad Bye-Election : अश्विनी जगताप यांच्या प्रचारात लोकांना लक्ष्मण जगतापांच्या आठवणीने अश्रु अनावर

एमपीसी न्यूज : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye-Election) भाजपाची उमेदवारी जाहीर होताच दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून त्यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी जिवाची पर्वा न करता पक्षानिष्ठा दाखवून दिली होती. त्यामुळे त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या प्रचार मोहिमेत भाजप आणि मित्रपक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची त्यांना परिवारासारखीच साथ मिळत आहे.

त्यांच्या साथीने अश्विनी जगताप यांनी प्रचारात आघाडी घेत संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीत दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणीने लोक अक्षरशः गहिवरत आणि रडत असल्याचे चित्र आहे.

लक्ष्मणभाऊंनी मतदारसंघात केलेला विकास, नागरिकांना केलेल्या मदतीच्या आठवणींना लोक उजाळा देत आहेत. तुम्हाला एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी विजयी करूनच आम्ही लक्ष्मणभाऊंना खरी श्रद्धांजली वाहणार आहोत, असे वचनच लोक त्यांना देत आहेत.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या गृह भेटीला मतदारसंघातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. चांगले वक्तृत्व आणि महिला व युवतींशी सहज संवाद यामुळे त्यांचा गृहभेट दौरा निवडणूक प्रचारात कमालीचा प्रभावी ठरतो आहे. दररोज शेकडो घरात जाऊन त्या महिलांशी संवाद साधत आहेत.

त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. त्यांच्या (Chinchwad Bye-Election) प्रत्येक भेटीत दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींनी लोक गहिवरत असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण अक्षरशः रडतात.

डोळ्यात अश्रू घेऊनच लोक चिंचवड मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केलेले काम तसेच सर्व जाती-धर्मातील लोकांना केलेल्या मदतीला उजाळा देत आहेत. अश्रू पुसत पुसत अश्विनी जगताप यांना आम्ही तुम्हाला केवळ आमदार बनवणार नाही, तर मताधिक्याने निवडून देणार आहोत, असे वचनच हे लोक देत आहेत.

त्यावरून लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाचे दुःख लोकांच्या मनातून गेलेले नसल्याचे जाणवत आहे. उलट निवडणूक प्रचारात अश्विनी जगताप यांच्या भेटीनंतर लोकांच्या मनात लक्ष्मणभाऊ जगताप यांचे स्थान किती अढळ आहे याची प्रचिती येत आहे. लोकांच्या या प्रेमामुळे भारावलेल्या अश्विनी जगताप दिवंगत पती लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेने उत्साहाने प्रचार करत असल्याचे चित्र आहे.

Today’s Horoscope 11 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.