Chinchwad Bye Election : भाजपने हार स्वीकारल्याची मानसिकता – रोहित पवार

एमपीसी न्यूज – भाजपचा कोणताही नेता चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सहभागी होत नसल्याने  त्यांनी हार स्वीकारल्याची मानसिकता ( Chinchwad Bye Election )  दिसून येते. कोणताही गाजावाजा न करता आपले काम शांतपणे विकासकाम करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे विकासकामांच्या पुण्याईवरच निश्चित निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

नाना काटे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेत आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेविका शमीम पठाण, वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, माऊली सूर्यवंशी, लाला चिंचवडे, विनोद कांबळे, ज्योती गोफणे, संगीता कोकणे, सचिन नखाते, अभिजित भालेराव, धनंजय भालेकर, धनंजय वाल्हेकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Chakan News : 800 किलो भंगार चोरीला,सुरक्षा रक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून ठेवले बांधून

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे काहीही बोलले ते खरं होणार आहे का? इथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनाच झटका बसणार आहे. याआधीही वंचितमुळे अनेक ठिकाणी नुकसान घडून आले आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी याकडेही पाहिले पाहिजे. भाजप हा राज्यघटनेच्या विरोधात वागत आहे. वंचितचे कार्यकर्तेही राज्यघटनेविरोधात काम करणार्‍या पक्षाला धडा शिकविण्यासाठी नाना काटे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

ही पदयात्रा प्रभाग क्रमांक 26 मधील बिजली नगर, चिंचवडे नगर, आशाताई माऊली सूर्यवंशी संपर्क कार्यालय, गणपती मंदिर, शिवनगरी चौक, तुळजाभवानी मंदिर, साई मंदिर, बळवंत नगर, हनुमान मंदिर, साईराज कॉलनी, स्पाईन रोड,चौक, दगडोबा चौक आदी मार्गांवरून ( Chinchwad Bye Election )  निघाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.