Chinchwad Bye-Election : महागाई, बेरोजगारी विरोधात जनता महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करेल – कैलास कदम

एमपीसी न्यूज – महागाई, बेरोजगारी विरोधात (Chinchwad Bye-Election) जनता महाविकास आघाडीचा उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विजयी करेल, असा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. कार्यकर्त्यांना आपल्या प्रभागांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सज्ज केले आहे. या बैठकीद्वारे कोकण रत्न विकास महासंघ, विविध महिला बचत गट, युवक संघटना, विविध समाजाच्या संघटना, परिसर निहाय कार्यकर्त्यांचा संच यांनी आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना पुष्पगुच्छ देत आपला पाठिंबा जाहीर केला.

थेरगाव येथे झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी महापौर कविचंद भाट, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव गौतम आरकडे, प्रदेश महिला काँग्रेसचे सरचिटणीस शोभा पगारे आदी उपस्थित होते.

Pune Crime : कोल्ड्रींक मध्ये गुंगीचे औषध टाकून 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार

भाऊसाहेब भोईर म्हणाले, “काँग्रेस माझा जुना परिवार आहे. या बैठकीत मला माझ्या स्वगृही परतल्याचा आनंद होत आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजप सरकारने जी खोटी आश्वासने दिली. त्याच्या विरोधात उत्तर देण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना अधिकाधिक प्रमाणामध्ये संपर्क करावा”.

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले “महापालिकेतील भ्रष्टाचाराने शहरातील लाखो लोकांची मान शरमेने खाली जाईल, असे वर्तन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये घडलेले आहे. देशात कामगार चळवळ मोडीत काढण्यासाठी अन्यायकारक, कामगार कायदे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अदानी सारख्या उद्योजकांचा भरणा करून नागरिकांच्या पैशाची लूट केली जात आहे. या सर्वांवर उत्तर देण्यासाठी चिंचवड मतदार संघाच्या माध्यमातून हा उमेदवार विजयी करून दाखवू” असा निश्चय कदम यांनी व्यक्त केला.

आमदार सुनील शेळके म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील एकंदरीतच नागरिकांची दुरावस्था या भाजप सरकारमुळे झालेली आहे. सहानुभूतीच्या नावाने मत मागणा-यांनी पुण्यामध्ये काय भूमिका घेतली. यावरून नागरिकांना भाजपची भूमिका स्पष्ट होत आहे. (Chinchwad Bye-Election) पुण्यात निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवार जिंकेल आणि या ठिकाणी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचे माध्यमातून जिंकेल.

नाना काटे म्हणाले, “माझ्या कार्याची पावती पिंपळेसौदागरचा विकास देतो आहे. शहरातील भाजपची व्यवस्था बदलवून टाकण्यासाठी, या निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी आपण सर्व मायबाप जनतेने मला आशीर्वाद द्यावा. निश्चितपणे विकासाचे एक नवे पर्व हे चिंचवड मतदार संघात मी आपल्या सर्वांचे विश्वासावर घडवून दाखवेन.

याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव दीपक साईसर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, (Chinchwad Bye-Election) चिंचवड मतदार संघ काँग्रेसचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे,

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, स्वप्निल बनसोडे, रवी नांगरे, निखिल भोईर, सचिन कोंढरे, मिलिंद बनसोडे, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, रोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरवदे, ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष झेवियर एंथनी, इस्माईल संगम, जुबेर खान, डॉ. मनीषा ताई गरुड, प्रियंका मलशेट्टी, निर्मलाताई खैरे, भारतीताई घाग, नंदाताई तुळसे, महानंदा कसबे, संदीप शिंदे, श्याम भोसले, राजू ठोकळे, अबूबकर लांडगे, तानाजी काटे, पांडुरंग जगताप, बाबा बनसोडे,  गौतम ओव्हाळ, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, आण्णा पुरंदरे, इरफान शेख,  फिरोज शेख आधी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.