Pune Crime : कोल्ड्रींक मध्ये गुंगीचे औषध टाकून 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : बलात्काराचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेला जबरदस्तीने लग्न करायला लावून तिच्या आई वडिलांना मारुन टाकण्याची (Pune Crime) धमकी देण्यात आली. पुण्यातील सहकारनगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय पीडित तरुणीने या संदर्भात तक्रार दिली आहे

या प्रकरणी अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अभिमन्यू शेरेकर हे दोघे ही एकमेकांचे मित्र आहेत. त्याने एके दिवशी त्याने तरुणीला घरी बोलावले होते आणि कोल्ड्रींक मध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावर न थांबता त्याने पीडित महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून त्याने हे नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.

Symbiosis : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा तिसरा पदवीप्रदान सोहळा उत्साहात संपन्न

एप्रिल 2022 मध्ये अभिमन्यूच्या मित्र प्रशांत कोळी व वाहनचालक यांनी तिला ठाण्याला नेले आणि जबरदस्तीने अभिमन्यु याच्याबरोबर लग्न लावले. (Pune Crime) पीडित महिलेने फोटो डिलीट करण्याचे सांगितले असता अभिमन्युचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडिल दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. आईवडिलांना मारुन टाकु अशी धमकी दिली

या सगळ्या प्रकारानंतर सहकारनगर पोलिस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.