Chinchwad Bye Election : पक्ष आदेशाविरोधात काम करणा-यांची शिवसेनेतून हकालपट्टी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष ( Chinchwad Bye Election ) आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 8 पदाधिका-यांची हकालपट्टी केली आहे. शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ही कारवाई केली आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या नात्याने शिवसेनेचा पाठिंबा आहे. परंतु, काही पदाधिकारी पक्ष आदेशाविरोधात काम करत असल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

Chinchwad Bye Election : लक्ष्मणभाऊंचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनीताईंना साथ द्या – पंकजा मुंडे

त्यामध्ये चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत ( Chinchwad Bye Election ) पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर यांच्या पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.