Hinjawadi News : कारला ट्रकची धडक,  ट्रकचालकाकडून कार चालकाला शिवीगाळ व  मारहाण

एमपीसी न्यूज –  डॉक्टरच्या कारला धडक देत गाडीचे नुकसान ( Hinjawadi News) करत उलट डॉक्टरलाच मारहाण करत जखमी करणाऱ्या ट्रक चालक व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवारी (दि.19) दुपारी बावधन-भुगाव रोडवर घडली.

याप्रकरणी डॉ. संदिप चक्रधर मेहरे (वय 50 रा.बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चार जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Bye Election : पक्ष आदेशाविरोधात काम करणा-यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कारमधून जात असताना एम.एच.12 क्यू डब्ल्यू 3740 वरील ट्रक चालक याने भरधाव वेगात ट्रक आणून फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली. यात फिर्यादी यांच्या गाडीचे नुकसान झाले. यावेळी फिर्यादी यांनी जाब विचारला असत ट्रक चालकाने फोन करून इतर लोकांना चारचाकीतून बोलावून घेतले,त्यातूनदोन पुरुष व एक महिला आली.

त्यांनी फिर्यादींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यात फिर्यादी यांचे मनगट व बोट फ्रॅक्चर झाले आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ( Hinjawadi News) पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.