Talegaon Dabhade : युवकांनी पर्यावरणासाठी रोज सायकल चालवावी – महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने शिवजयंती ( Talegaon Dabhade)  निमित्त तळेगाव कामशेत तळेगाव ही 35 किलोमीटर अंतराची सायक्लोथोन आयोजित करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे यांचा तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराविषयी आभार व्यक्त करत ( Talegaon Dabhade)  पै शिवराज राक्षे यांनी  पर्यावरणासाठी युवकांनी रोज सायकल चालवावी, असे आवाहन केले.

याप्रसंगी तळेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,  तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश जदवडकर,पोलीस निरीक्षक नितीन लांडगे,रोटरेक्ट अध्यक्ष वैभव तनपुरे,उपाध्यक्ष हर्षद जव्हेरी,रो सुरेश शेंडे,रो संजय मेहता, रो शहीन शेख,रो रेश्मा फडतरे,रो शरयू देवळे,रो धनश्री काळे व रो सुनंदा वाघमारे उपस्थित होते.

रोटरी सिटीच्या सायक्लोथोन ( जॉय राईड ) पर्यावरण विषयक सायकल फेरीस प्रचंड प्रतिसाद मिळाला.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून तळेगाव कामशेत तळेगाव ही 35 किलोमीटर अंतराची सायक्लोथोन आयोजित केली होती यामध्ये 300 सायकल पटूंनी भाग घेतला होता त्या सर्व सायकलपटूंना मेडल व टी-शर्टचे वाटप करण्यात आले तर तळेगाव शहरातील ( Talegaon Dabhade) शालेय विद्यार्थ्यांसाठी जॉय राईट सायकल फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांसाठी टी-शर्ट देण्यात आले होते. सर्व सायकल पट्टूंसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सायकल फेरीचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या पत्नी सारिका भेगडे,DG रो शितल शहा,DRR ॲड आकाश चिकटे, रोटरी सिटीचे अध्यक्ष रोटरियन दीपक फल्ले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांचा तळेगाव शहरवासीयांच्या वतीने रोटरी सिटीतर्फे भव्य नागरी सत्कार DGN रो शीतल शहा, निलेश भोसले व रोटरी सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांच्या शुभहस्ते शिंदेशाही पगडी,शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आपण मला या ठिकाणी बोलावून माझा नागरिक सत्कार केला त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो व युवकांनी पर्यावरणासाठी दररोज सायकल चालवावी असे आवाहन महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे यांनी केले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रो शितल शहा यांनी रोटरी सिटीने पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी या सायकल फेरीचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले व पर्यावरणासाठी रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट तर्फे ( Talegaon Dabhade) आपणास नेहमी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली.याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल स्पर्धेत सहभागी झालेले संदीप शिंदे  अनिल खेडेकर, श्रीधर पाटील या आंतरराष्ट्रीय सायकल पट्टूंचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.

Hinjawadi News : कारला ट्रकची धडक,  ट्रकचालकाकडून कार चालकाला शिवीगाळ व  मारहाण

तळेगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाची शपथ सर्वांना देण्यात आली. पर्यावरण विषयक सायकल सजावट स्पर्धेत तीन पारितोषिके ज्येष्ठ रोटरियन हरिश्चंद्र गडसिंग यांनी जाहीर केली. रो दिलीप पारेख व रो विलास काळोखे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.प्रथम पारितोषिक आरोही प्रशांत ताय,द्वितीय पारितोषिक लावण्या आशिष शेलार व तृतीय पारितोषिक प्रथमेश संदीप पाटोळे या तीन विद्यार्थ्यांना मिळाले.

आलायजर जोसेफ (माउंट सेंट ॲन स्कूल), पौरस परदेशी (सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल), वशिष्ठ प्रजापती (ॲड पु वा परांजपे हायस्कूल) या तीन विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ मध्ये सायकली बक्षीस देण्यात आल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो प्रशांत ताय, रो प्रदीप टेकावडे,रो प्रदीप मुंगसे,रो संजय वाघमारे,प्रसाद बानगुडे,प्रसाद पादिर,राकेश ओसवाल,विनोद राठोड,मनोज राठोड,भगवान शिंदे,रघुनाथ कश्यप, आनंद पूर्णपात्रे व सर्व रोटरी सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो किरण ओसवाल यांनी तर आभार प्रदर्शन रो संतोष परदेशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.