Chinchwad Bye Election : भाजपने गृहनिर्माण सोसायटीधारकांवर पाणीटंचाई लादली – वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – भाजपच्या नेत्यांनी पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे आतापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. एक दिवसाआड, अपुऱ्या तसेच अवेळी होणाऱ्या ( Chinchwad Bye Election ) पाणीपुरवठ्यामुळे महिलांची मोठी तारांबळ होत आहे. भाजपनेच गृहनिर्माण सोसायटीधारकांवर पाणीटंचाई लादल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ वाकड, पिंपळे निलख परिसरातील सोसायटीधारकांशी चव्हाण यांनी संवाद साधला. माजी नगरसेवक  भाऊसाहेब भोईर,  तुषार कामठे, मयूर कलाटे, प्रभाकर वाघेरे, यांच्यासह संकेत जगताप, शिरीष साठे, आकाश साठे, विशाल वाकडकर, नानासाहेब काटे, माधव पाटील उपस्थित होते.

 

Talegaon Dabhade : युवकांनी पर्यावरणासाठी रोज सायकल चालवावी – महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे

खासदार चव्हाण म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहराचा वाढणारा भाग आणि लोकसंख्या यांचा विचार करून त्यांना लागणाऱ्या पाणीपुरवठा आणि अन्य सुविधांचे नियोजन करण्याची दूरदृष्टी अजित पवार यांच्याकडे होती आणि आहे. ती दृष्टी भाजपचे नेते व नगरसेवकांकडे नसल्याने हे प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेतील भाजपच्या पाच वर्षांच्या योजनशून्य कारभाराचा फुगा त्यामुळे फुटला आहे. भ्रष्टाचारी कारभारामुळे शहर ( Chinchwad Bye Election ) अधोगतीकडे जात आहे, असेही चव्हाण म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.