Chikhali : शिवजयंती निमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र टाळगाव चिखली (Chikhali) एक गाव एक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. पुणे, नाशिक, सांगली, सातारा, नगर, रत्नागिरी, अकोला, संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यातून पुरुष आणि महिला धावपट्टू सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड अथेलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने स्पर्धा घेण्यात आली होती. ओपन गटासाठी 5 किलोमीटर तर 15 वर्षाखालील गटासाठी 3 किलोमीटर अंतर पार करणे स्पर्धा ठेवण्यात आली होती. एकूण चार गटात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 2200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

Ravet : विकसनासाठी जागा देण्याच्या बहाण्याने 50 लाखांची फसवणूक

मॅरेथॉनचा निकाल खालीलप्रमाणे –
खुला पुरुष गट

प्रथम धुळदेव बबन घागरे (बालेवाडी पुणे 16 मिनिट 48 सेकंद)
द्वितीय रामेश्वर मुंजाळ (छत्रपती संभाजीनगर 17 मिनिट 8 सेकंद)
तृतीय तेजस सुरेश पवार (पुणे 17 मिनिट 22 सेकंद)

खुला महिला गट – Chikhali

प्रथम यामिनी ठाकरे (पिंपरी चिंचवड सिटी पोलीस 20 मिनिट 3 सेकंद)
द्वितीय आकांक्षा प्रकाश शेलार (सातारा 20 मिनिट 8 सेकंद) तृतीय साक्षी जड्याळ (रत्नागिरी 20 मिनिट 13 सेकंद)

15 वर्षांखालील मुले

प्रथम वेदांत कैलास वाघमारे (अकोला 9 मिनिट 25 सेकंद)
द्वितीय रितेश दिलीप चंदनकर (पुसद 9 मिनिट 33 सेकंद)
सिद्धनाथ सत्यवान जगताप (सांगली 9मिनिट 35 सेकंद)

15 वर्षांखालील मुली

प्रथम प्रिया शंकर गुळवे (पारनेर 11 मिनिट 8 सेकंद)
द्वितीय शाहीन बानो (काळेवाडी 11 मिनिट 12 सेकंद)
तृतीय अदिती हरगुडे (पुणे 11 मिनिट 45 सेकंद)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.