Ravet : विकसनासाठी जागा देण्याच्या बहाण्याने 50 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – विकसनासाठी जागा देण्याच्या (Ravet) बहाण्याने 50 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 20 मे 2021 रोजी भोंडवे वस्ती, रावेत येथे घडला. याप्रकरणी 24 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरेनकुमार बाबुभाई पटेल (वय 38, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप शिवाजी भोंडवे (रा. भोंडवे वस्ती, रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : हिंदु जनजागृती समितीची खडकवासला धरण परिसरात जलप्रदूषण रोखण्यासाठी मानवी साखळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भोंडवे यांनी जमीन मालक गुलाब तुकाराम भोंडवे, सिताराम तुकाराम भोंडवे व दिवंगत साहेबराव तुकाराम भोंडवे यांचे वारस यांची रावेत येथील 118 गुंठे जमीन जॉईंट व्हेंचरद्वारे विकसन करण्यासाठी देतो असे फिर्यादीस सांगितले. सिताराम तुकाराम भोंडवे व दिवंगत साहेबराव तुकाराम भोंडवे यांच्या वारसांना देण्यासाठी म्हणून समजूतीच्या करारनामा द्वारे डिपॉझिट (Ravet) म्हणून 50 लाख रुपये घेतले.

अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही ती रक्कम सिताराम तुकाराम भोंडवे व दिवंगत साहेबराव तुकाराम भोंडवे यांच्या वारसांना दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांच्याशी जागा विकसन करण्यासाठी विकसन करार करून न देता विश्वासघात व फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.