Hinjawadi : किरकोळ कारणावरून तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – तू कॉलेजमध्ये कोणत्या मुलीस काय बोलला, असे म्हणत (Hinjawadi)आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 30) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कडधे मावळ येथे घडली.
साहिल बाळासाहेब देशमुख (वय 19, रा. कडधे, मावळ) यांनी हिंजवडी पोलीस (Hinjawadi)ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल काकडे, नागेश आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी साहिल देशमुख यांना ‘तू कॉलेजमध्ये कोणत्या मुलीस काय बोलला’, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशाल काकडे याने साहिल यांना प्लास्टिकच्या पाईपने पाठीत मारहाण करून दुखापत केली.

लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ‘याला लय माज आला आहे. याला मारा’ असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.