Talegaon : हद्दीतून ये-जा करण्यासाठी ट्रक चालकाकडे मागितली खंडणी

एमपीसी न्यूज- हद्दीतून ये जा करायचे असेल तर प्रत्येक ट्रीपला दोन हजारांची (Talegaon)खंडणी मागत ट्रक चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 30) शिरगाव फाटा, सोमाटणे टोलनाक्या जवळ घडली.

राहूल लक्ष्मण बोऱ्हाडे (वय 28, रा. आष्टी, बीड) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस(Talegaon) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमन भाई व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा ट्रक घेवून सोमाटणे टोलनाका पास करून शिरगाव फाट्यावरून जात होते. यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे प्रत्येक ट्रीपला 2 हजार रुपये खंडणीची मागणी केली. जर खंडणी दिली नाही तर हातपाय मोडून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दगडाने मारून फिर्यादींना जखमी करत त्यांच्या गाडीचे ही नुकसान केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.