Chinchwad : चिखलीतील रेनवा टोळीवर ‘मोका’ची कारवाई

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Chinchwad)सराई गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. चिखलीतील रेनवा टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. मागील तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये टोळी प्रमुख निलेश पुखराज(Chinchwad) रेनवा (वय 27, रा. टॉवर लाईन, म्हेत्रे वस्ती, चिखली), रोहन कमलाकर कावळे (वय 29, रा. नेवाळे वस्ती, चिखली), दत्तात्रय संतोष शिंदे (वय 23, रा. मोरे वस्ती, चिखली), सुमित विलास क्षिरसागर (वय 20, रा. ताराबाई चौक, शिवकृपा कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांच्यासह विधी संघर्षीत दोन बालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

टोळी प्रमुखनिलेश रेनवा व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात चिखली, वाकड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, चोरी, खंडणी, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

टोळीमधील सदस्यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अतंर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्‍त कार्यालयाकडे सादर केला. प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून या गुन्ह्यामध्ये आणखी काही कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारीत केले.

Telicommunication Department : दूरसंचार विभागाच्या नावाने तोतयागिरी करणाऱ्यांवर सरकारची नजर

पोलीस आयुक्‍त विनय कुमार चौबे, अपर आयुक्‍त वसंत परदेशी, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्‍त शिवाजी पवार, सहायक आयुक्‍त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, तसेच पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

तीन महिन्यांत 36 गुन्हेगारांना मोकाचा दणका

लोकसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पाडता यावी यासाठी पोलीस आयुक्‍त विनय कुमार चौबे यांनी प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. दरम्यान पोलीस आयुक्त चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्यांच्या कालावधीत पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सात संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 36 गुन्हेगारांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.