Wakad : एकाच दिवसात 406 वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – फॅन्सी नंबर प्लेट व काचेला काळी फीत  (टीन्ट ग्लास) लावल्या (Wakad)प्रकरणी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाकड परिसरात शनिवारी (दि. 30) 406 वाहनांवर कारवाई केली. फिनिक्स मॉल वाकड आणि थेरगाव येथे केलेल्या कारवायांमध्ये 4 लाख 37 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

फिनिक्स मॉल वाकड येथे कारवाई करत दिवसभरात एकूण 305 वाहनांच्या (Wakad)काळ्या काचा पोलिसांनी उतरवल्या आहेत. तसेच संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा कारवाई होत असल्यास 500 रुपये दंड केला जातो. एकदा कारवाई करूनही काळ्या काचा काढल्या नाहीत तर पुन्हा कारवाई करताना वाहन चालकावर 1500 रुपयांचा दंड केला जातो. वाकड येथील कारवाईमध्ये 2 लाख 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Loksabha Election 2024 : आचारसंहितेपर्यंत मद्यपरवाने मिळणार नाहीत

वाकड वाहतूक विभागाने थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर देखील कारवाई केली. रस्त्यावर पार्क होणाऱ्या 47 वाहनांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

गोल्डन गाईजलाही ठोठावला दंड

गोल्डन गाईज म्हणून शहरात गोल्डन रंगाची ऑडी घेवून फिरणाऱ्या वहानचालकावर देखील काचांना काळी फीत लावल्या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी दंड आकारला आहे. यावेळी गाडीला हवा तो कलर द्या मात्र काचेला काळी फीत आणि फॅन्सी नंबरपासून दूर ठेवा असा सल्ला पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.