Chakan : अनधिकृत वीज जोडणी घेतल्याने कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

एमपीसी न्यूज – थकीत वीज बिल तसेच वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यासाठी (Chakan)आलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्ती विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई शनिवारी (दि. 30)  चाकण येथील शिक्षक कॉलनी परिसरात करण्यात आली.

महावितरणचे कर्मचारी रामा इबतवार (वय 37, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस (Chakan)ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत पंढरीनाथ येलवंडे (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : हद्दीतून ये-जा करण्यासाठी ट्रक चालकाकडे मागितली खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  हे त्यांच्या सहका-यांसह चाकण येथील शिक्षक कॉलनी येथे थकीत वीजबील वसुलीसाठी गेले होते. यावेळी आरोपी यानेही वीज बिल न भरल्यामुळे त्यालाही वीज बिल भरण्यासाठी सांगितले. यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले.

 

आरोपीला या आधीही वीज बिल थकबाकीवरून कारवाई करत मीटरचे कनेक्शन कट केले होते. मात्र त्याच्या घरात वीज असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. तिथे पाहणी केली असता आरोपी हा त्याचे किराणा दुकान व एचडीएफसी एटीएमच्या मीटरमधून वीज चोरून वापरत असल्याचे लक्षात आले. फिर्यादी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विजेच्या खांबावर चढून कनेक्शन कट करण्यास सांगितले.

यावेळी आरोपीने शिवीगाळ करत कनेक्शन कट करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दगडफेक केली. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करत पोलीसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी हा प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड करण्यासाठी फोन सुरु केला असता आरोपीने त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की करून मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.