Mahalunge : बेकायदेशीरपणे सिलेंडर बाळगल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विनापरवाना बेकायदेशीरपणे सिलेंडर बाळगल्या(Mahalunge )प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 30) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वाघजाईनगर येथे करण्यात आली.
प्रमय दिलीप घनरे (वय 23, रा. खराबवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या  तरुणाचे (Mahalunge )नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शरद खैरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घनरे याने घरगुती वापराचा 14 किलो वजनाचा सिलेंडर विनापरवाना बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत घनरे यांच्या ताब्यातून तीन हजार रुपये किमतीचा सिलेंडर जप्त केला. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=bijh7Oon4s0&ab_channel=MPCNews

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.