Chinchwad Bye Election : लक्ष्मणभाऊंचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनीताईंना साथ द्या – पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज – दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शहरातील प्रश्नांसाठी (Chinchwad Bye Election) आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युतीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले. लक्ष्मभाऊंचे शहराच्या विकासाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना साथ द्यावी असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी  जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीतील आयोजित सभेत त्या बोलत होत्या. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, राज्याच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर यांच्यासह भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Pimpri News : धानोरे मध्ये शिवजयंती निमित्त भक्ती-शक्ती अशी अनोखी शोभा यात्रा

पंकजा मुंडे म्हणाल्या, “दिवंगत गोपीनाथ मुंडे खासदार झाले आणि केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर सहाव्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून आमच्या कुटुंबांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना सावरता आले नाही. गेलेल्या माणसाची जबाबादारी सांभाळताना काय कसरत करावी लागते, याची मला जाणीव आहे. आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाही तशीच कसरत करताना मी पाहिले आहे.

पती आपल्यामध्ये नाही हे दुःख बाजूला ठेवून संयम आणि जबाबदारीने त्या वागत (Chinchwad Bye Election) आहेत. लोकांसमोर बोलत आहेत. एक स्त्री म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. सत्तेबाहेर असतानाही येथील जनतेने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम केले. त्यांचे शहराच्या विकासाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन त्यांच्या कारकि‍र्दीवर प्रेम व्यक्त करा, असे आवाहन त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.