Pimpri News : धानोरे मध्ये शिवजयंती निमित्त भक्ती-शक्ती अशी अनोखी शोभा यात्रा

एमपीसी न्यूज- काल (दि. 19) फेब्रुवारी  रोजी जिल्हा ( Pimpri News) परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे ता-खेड, पुणे. शाळेच्या प्रांगणात शिवजयंती सोहळा आयोजित केलेला होता.

या प्रसंगी सुरुवातीला शिवजयंती निमित्त  भक्ती-शक्ती अशी अनोखी  शोभा यात्रा आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज  संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात भेटीसाठी आले असता आदिलशाही  सैन्य महाराजांना पकडण्यासाठी येतात. तेव्हा कीर्तनात सर्वच शिवाजी महाराज दिसू लागतात.सर्वत्र महाराज व मावळे दिसू लागताच त्यावेळी आदिलशाही सैन्य त्या ठिकाणाहून पळ  काढते.त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसह शिवछत्रपती व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची मिरवणूक काढली जाते. हे नाट्य यावेळी सादर करण्यात आले.

Chinchwad News : शिवतेजनगर मध्ये रंगला शिवजन्मोत्सव सोहळा

त्यानंतर शिवचरित्र  वर आधारित  शुभदा बवले  या विद्यार्थीनीचे  ( Pimpri News) व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमासाठी  विद्यार्थी मावळ्यांच्या वेषात व विद्यार्थीनी महिलांच्या पारंपरिक वेषात उपस्थित होत्या. ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने शिवजयंती  व शोभयात्रेसाठी  उपस्थित होते.

याबाबत माहिती धानोरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.