Talegaon Dabhade : मावळ तालुक्यात सुरू असलेल्या चुकीच्या कामांबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या तक्रारी

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या वतीने सद्य परिस्थितीत (Talegaon Dabhade)मावळ तालुक्यात चालू असलेल्या अनेक चुकीच्या कामाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी मांडल्या.

काँग्रेस,शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), आरपीआय (निकाळजे गट) या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील चुकीच्या कामांबाबत तक्रारी आणि सूचना मांडत आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याबाबत चर्चा झाली.

Pune : आवडत्या पुस्तकांच्या खरेदीची पुणेकरांना अखेरची संधी; पुणे पुस्तक महोत्सवाचा रविवारी समारोप

महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने सद्य परिस्थितीत मावळ तालुक्यात (Talegaon Dabhade)चालू असलेल्या अनेक चुकीच्या कामाबाबतीत तक्रारी,सूचना जाणून घेण्यासाठी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी एकत्र महाविकास आघाडीतील मिञ पक्ष”काँग्रेस – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), आर पी आय (निकाळजे गट) पदाधिकारी यांची बैठक तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली.

यावेळी माजी मंत्री मदन बाफना,ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर,रामदास काकडे,दिलीप ढमाले,शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे,युवक काँग्रेस मा तालुकाध्यक्ष गणेश काजळे, मा. नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड,रोहिदास वाळुंज ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे,मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पै राजेश वाघोले, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, शादान चौधरी, जयश्री पवार,पुष्पा भोकसे,किसन कदम,राजेश वाघोले,सुनिल शिंदे, मदन शेडगे, शांताराम भोते,मिकी कोचर,बारकू ढोरे,पांडुरंग दाभाडे,संभाजी राक्षे,सुधाकर वाघमारे,भरत राजीवडे, गफूरभाई शेख,मधुकर कंद,नासिर शेख,मारुती आडकर,सहादू आरडे, रमेश घोजगे,योगेश चोपडे, आदिनाथ मालपोटे,अक्षय मुऱ्हे,शंकर मोढवे, नवनाथ केदारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील नागरिकांचे न सुटणारे विविध प्रश्न,शेतकऱ्याची व्यथा यावर एकत्रित आंदोलन उभारणे,महिलांचे प्रश्न सोडवणे, विविध शासकीय योजना,चालू असलेला कामातील भ्रष्टाचार, प्रशासनातील अरेरावीपणा, येणाऱ्या पुढील काळातील लोकसभा,विधान सभा,स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका एकत्रितपणे लढविणे अशा महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

27 ते 30 डिसेंबर रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा मध्ये सहभागी होण्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना या मुजोर सरकारच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी ताकद देण्यात येईल असे आश्वासन सर्व प्रमुख पदाधिकारी माजी मंत्री मदन बाफना,ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, दिलीप ढमाले, शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवक काँग्रेस मा तालुकाध्यक्ष गणेश काजळे, मा. नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड,रोहिदास वाळुंज आदींनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. काँ. पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत,प्रास्ताविक मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, स्वागत काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, आभार रा. काँ. युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी केले.यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आक्रोश मोर्चातही होणार सहभागी

राज्यातील अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसह विविध प्रश्न सोडविण्यात महायुती सपशेल अपयशी ठरली आहे. याचा जाब विचारण्यासाठी 27 ते 30 डिसेंबर रोजी खासदार डॉ अमोल
कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.