Pune : आवडत्या पुस्तकांच्या खरेदीची पुणेकरांना अखेरची संधी; पुणे पुस्तक महोत्सवाचा रविवारी समारोप

एमपीसी न्यूज – पुणेकरांनी अलोट प्रतिसाद दिलेला, उत्तमोत्तम कार्यक्रमांची (Pune)मेजवानी दिलेला, चार विश्वविक्रमांची नोंद झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा रविवारी (24डिसेंबर) समारोप होणार आहे. त्यामुळे मनपसंत पुस्तकांची सवलतीच्या खरेदी करण्यासाठी रविवारी अखेरची संधी आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे (Pune)आयोजन करण्यात आले. 16डिसेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवात वीस भाषांतील पुस्तकांचे दोनशेहून अधिक स्टॉल आहेत.

त्याशिवाय डॉ. कुमार विश्वास, लेखक विक्रम संपत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मुलाखती, तुकाराम दर्शन, श्रीमंत योगी, लोकरंग, फैजल काश्मिरी बँड असे उत्तमोत्तम कार्यक्रम या महोत्सवात झाले.

Chandrakant Patil : महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढण्यात स्वारस्य नव्हते : चंद्रकांत पाटील

या महोत्सवात पुणेकरांना शहीद भगतसिंह यांची डायरी, देशाच्या घटनेची मूळ प्रत पाहण्यासाठी उपलब्ध होती. पुस्तकांसह इतर आकर्षणे असल्याने पुणेकरांनी गेले आठ दिवस पुणे पुस्तक महोत्सवाला तुडुंब प्रतिसाद दिला. जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त पुणेकरांनी महोत्सवाला भेट दिली. त्यात तरुण, शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळेच पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

त्यामुळे पहिल्याच वर्षी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी ठरला.महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे म्हणाले, की पुणे पुस्तक महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे.

या महोत्सवातील कार्यक्रम, पुस्तक खरेदीचा आनंद पुणेकरांनी मनसोक्त घेतला याचे मनस्वी समाधान आहे. पुस्तक प्रदर्शनातील पुस्तकांच्या विक्रीमुळे प्रकाशक, विक्रेतेही आनंदात आहेत. महोत्सवाला दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी पुणेकरांचे मनापासून आभार व्यक्त करावेसे वाटतात. पुणेकर वाचतात, पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे, हे या महोत्सवामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पुणेकरांनी महोत्सवाला दिलेल्या प्रतिसादामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. तसेच जबाबदारीही वाढली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.