Today’s Horoscope 24 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज- आजचे पंचांग-Today’s Horoscope 24 December 2023

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख 24.12.2023.

शुभाशुभ विचार- कृत्तिका वर्ज्य.

आज विशेष – प्रदोष.

राहू काळ – संध्याकाळी 04.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – कृत्तिका 21.19पर्यंत नंतर रोहिणी.

चंद्र राशी – वृषभ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

वृषभ ( शुभ रंग- मोतिया)
आज अति उत्साहाने तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले गवसेल.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ.

सिंह -( शुभ रंग – पांढरा)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांना वेळ देणे अवघडच होईल.

कन्या – ( शुभ रंग- क्रीम)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)
आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःला जपा.

वृश्चिक ( शुभ रंग – राखाडी)
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

धनु (शुभ रंग- निळा)
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मकर- ( शुभ रंग – डाळिंबी)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

मीन ( शुभ रंग- मोरपंखी)
शेजार्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. आईचे मन दुखावू नका.आज वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करा.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.