Vadgaon : भाजपच्या पुणे जिल्हा आयुष्मान भारत संयोजक पदी सी. ए. योगेश म्हाळसकर

एमपीसी न्यूज – भाजपच्या उत्तर पुणे जिल्हा(Vadgaon) आयुष्मान भारत संयोजक पदी (संघटनात्मक नियुक्ती) वडगाव मावळ येथील सी. ए. योगेश कृष्णा म्हाळसकर यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते म्हाळसकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा व मावळ तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Pune : आवडत्या पुस्तकांच्या खरेदीची पुणेकरांना अखेरची संधी; पुणे पुस्तक महोत्सवाचा रविवारी समारोप

योगेश म्हाळसकर मागील अनेक वर्ष समाजकारणात (Vadgaon)सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये चिटणीस, भाजयुमो मावळ हे पद भूषवले आहे.

सीए योगेश कृष्णा म्हाळसकर हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून राजकीय कारकिर्दी प्रमाणे सामाजिक व धार्मिक कार्यात देखील ते सक्रिय आहेत. मावळ विचार मंच, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती, आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र बहुउद्देशीय समिती आदी संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत.

निवडीबाबत बोलताना योगेश म्हाळसकर म्हणाले, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या योजनेवर काम करण्याची मिळालेली संधीचा उपयोग करून माझा पुणे जिल्हा व मावळ तालुका आयुष्मान व आरोग्य सक्षम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.