Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाताळ सण साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade)कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री प्रायमरी विभागामध्ये नाताळ सण व व्हाईट डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, प्रायमरी विभागातील सर्व शिक्षक व पर्यवेक्षिका मीरा चव्हाण उपस्थित होत्या.

Vadgaon : भाजपच्या पुणे जिल्हा आयुष्मान भारत संयोजक पदी सी. ए. योगेश म्हाळसकर

यावेळी नर्सरी ते सीनियर गटातील (Talegaon Dabhade)सर्व विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. या कार्यक्रम प्रसंगी ख्रिसमस ट्री बनविण्यात आला होता.

यावेळी विद्यार्थ्यांकडून ॲक्टिव्हिटी घेण्यात आली त्यामध्ये कार्ड पेपर व आईस्क्रीमच्या काड्यांच्या सहाय्याने सांताक्लॉज बनविण्यात आले. नाताळ सणावर आधारित गाणी लावण्यात आली होती व त्या गाण्यावर सर्व चिमुकल्यांनी नृत्य सादर केले. सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद दिसून येत होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.