Chinchwad : चिंचवडकरांनी लुटला नव्वदच्या दशकातील सदाबहार गीतांचा आनंद

एमपीसी न्यूज – प्यार हुआ चुप के से….पेहला नशा….साथिया तुने क्या किया अशा सदाबहार (Chinchwad) गाण्याच्या मैफिलीने पिंपरी-चिंचवडचे रसीक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते शनिवारी (दि.20) आलाप एंटरटेनमेंट आणि स्मिताज दि पुणेरी ग्रुव्हस आयोजित  ’90 का नशा’ नावाचा सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम चिंचवड मधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजीत केला होता. ज्याचे मीडिया पार्टनर म्हणून ‘एमपीसी न्यूज’ ने काम पाहिले.

 

महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त जोहर चुनावाला, संगीतकार तेजस चव्हाण, कार्यक्रमाचे प्रायोजक व किक – ईव्ही आकुर्डी शोरुमचे मालक अनुप शहा, डिजिटल मीडिया पार्टनर एमपीसी न्यूज चे मुख्य संपादक विवेक इनामदार, टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी सुनील सवाई तसेच मनीषा समर्थ, अपर्णा मिसाळ आदी उपस्थित होते.

IPL 2023 : कॉलिफायर 1 मध्ये धोनीचा हुकुमाचा एक्का संपवेल का गुजरातचे चेन्नईवर वर्चस्व?

प्रशांत साळवी आणि स्मिता बोकील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजीत केला होता. ज्यामध्ये एक नाही, दोन नाही तर 11 गायकांनी गाणी सादर केली. आखों की गुस्ताखी या…. चुराके दिल मेरा…. जो हाल दिल का… अशी अनेक सदाबहार गाणी सादर करण्यात आली. ज्यामुळे उपस्थितांना अगदी त्यांचे महाविद्यालयीन दिवस आठवले.

या कार्यक्रमात आणखी रंगत आणण्यासाठी चिंतन मोढा, अमन सय्यद, तन्मय पवार, लिजेश शशिधरण, अभिजित भडे, केदार मोरे, सोमनाथ फाटके, विशाल गंद्रतवार, आयुष शेखर , अमन, तन्मय यांनी साथ दिली. रिचर्ड  यांनी उत्तम फोटोग्राफी केली, प्रकाश गायकवाड यांनी सर्व कार्यक्रम हा आपल्या व्हीडीओ कॅमेरा मध्ये बांधिस्त केला, प्राजक्ता श्रावणे यांनी खूप सुंदर असं निवेदन  केले.भरलेले सभागृह, टाळ्य़ा आणि वन्स मोर ची मागणी याने या मैफलीला वेगळीच रंगत (Chinchwad) चढली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.