IPL 2023 : क्वाॅलिफायर 1 मध्ये धोनीचा हुकुमाचा एक्का संपवेल का गुजरातचे चेन्नईवर वर्चस्व?

एमपीसी न्यूज – क्वाॅलिफायर 1 मध्ये, आज दिनांक 23 मे 2023, मंगळवार रोजी (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी आमने सामने जाणार आहेत. सामना हा चेन्नईच्या घरेलू मैदान, एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स हा जरी आयपीएलचा एक यशस्वी संघ असला तरी त्यांनी नव्या आलेल्या गुजरात टायटन्सवर अद्याप विजय मिळवलेला नाही. आजवर झालेल्या 3 सामन्यांमध्ये जरी गुजरात सर्व सामन्यात विजयी आहेत तरीही चेन्नईच्या घरात सीएसकेवर विजय मिळवणे जीटीला अवघड जाऊ शकते.
चेपॉकमधील सीएसके विरुद्ध एलएसजी ह्या पहिल्या सामन्यांमध्ये धावांचा वर्षाव झाला होता. दोन्ही संघानी 200 पेक्षा अधिक धावसंख्या मंडळी होती. परंतु त्या सामान्यापासून चेन्नईचे पीच हे फार मंदावले आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये चेन्नईच्या मैदानावर सरासरी धावसंख्या ही मात्र 150 धावांपर्यंत पोहोचली आहे. या दोन्ही संघांकडे उत्कृष्ट (IPL 2023) फलंदाजी व गोलंदाजी आहे. त्यावरून चांगली गोष्ट म्हणजे हवामान खात्याने असा अंदाज बांधला आहे कि चेन्नई व गुजरात यांचा सामन्यामध्ये पावसाचा अडटळा नसेल. यामुळे ज्या संघाचा दिवस चांगला असेल आणि मौक्याचा क्षणी शांत डोक्याने विचार करतील तोच संघ विजयी ठरेल व थेट अंतिम फेरीत जाईल.
Chakan : विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची खेड तालुक्यात हजेरी
दोन्ही संघांकडे उत्कृष्ट फलंदाजी आहे. शुभमन गिल, रिद्धिमान सहा, देवोन कॉन्वे व ऋतुराज गायकवाड हे चांगली कामगिरी करत आहेत. त्याच प्रमाणे चेन्नई व गुजरातकडे फिरकी गोलंदाजीचेही चांगले पर्याय आहेत. गुजरात कडून रशीद खान, नूर अहमद आणि राहुल तेवतीया तर चेन्नईकडून जडेजा, तीक्षणा आणि मोईन आली हे प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी करीत आहेत. तसे पाहायला गेले तर दोन्ही संघांचे वरच्या फळीतील फलंदाजच चांगली कामगिरी करत आहेत. चेन्नईकडून रवींद्र जडेजा, कर्णधार एम एस धोनी आणि अंबाती रायुडू हे काही फार चालले नाहीत. गुजरातची हि खालची फळी जास्त चालली नाही. दोन्ही संघांसाठी चांगली गोष्ट म्हणजे पॉईंट्स टेबल वर चांगले स्थान मिळवल्यामुळे आजच्या सामन्यात जरी पराभव आला तरी दुसरी संधी मिळेल.
दोन्ही संघांमध्ये काही बदल असतील असे सांगू शकत नाही. गुजरातला तर संघामध्ये चांगले संयोजन मिळाले आहे म्हणून त्यांचा संघात फारसा बदल नसावा. सहा,गिल, पंड्या (C), मिलर, शंकर, तेवतीया, शनाका, रशीद, नूर, शमी, यश व मोहित (इम्पॅक्ट प्लेअर) हेच त्यांचे 11 असतील. चेन्नईकडून कॉन्वे, गायकवाड, राहणे, रायुडू, दुबे, मोईन, जडेजा, धोनी (C), चाहर, तीक्षणा, देशपांडे आणि पाठीराना (इम्पॅक्ट प्लेअर) हे 11 खेळाडू असतील. परंतु आयपीएलच्या सुरुवातीनंतर इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स हा चेन्नईसाठी खेळला नाही. धोनी त्याला हुकुमाचा एक्का म्हणून वाचवून ठेवतोय असे बऱ्याच चाहत्यांचे मत आहे. सामना कसे रूप घेतो हे मात्र नक्कीच बघण्या सारखे (IPL 2023) ठरेल.