Chinchwad : सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार राजपाठक यांचे निधन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार श्रीपाद राजपाठक (वय 78) यांचे आज सकाळी अल्पशा अजाराने निधन झाले. समाजसेवक (Chinchwad) व आरोग्यदूत म्हणून परिचित असलेल्या स्वानंद राजपाठक यांचे ते वडील होत.

विजयकुमार राजपाठक यांचा जन्म 25 मार्च 1945 मध्ये बारामती येथे झाला होता. ते नोकरी निमित्त 1988 साली  पिंपरी चिंचवड शहरात आले होते. ते महाराष्ट्र राज्य वीज मंडळात नोकरीस होते.

त्यांनी इंटक या कामगार संघटनेत राज्य पातळीवर काम करत राज्यातील वीज कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. ते अंतीम क्षणापर्यंत सामाजिक कार्य करत होते. इपीएस 95 या सामाजिक संघटनेत सल्लागार म्हणून त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर!

विजयकुमार राजपाठक यांचे पश्चात समाजसेवक स्वानंद राजपाठक हे पुत्र व पुणे शहरातील (Chinchwad) उद्योजिका तेजस्वीनी जोशी ही कन्या, सून आणि जावई तसेच नातवंडे असा परिवार आहे.

उद्या 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांचे पार्थिव साई ग्रेस सोसायटी, चिंचवड गाव येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार असून उद्या सकाळी 10.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर लिंक रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.